अखेर तिढा सुटला! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा

कार्तिकी एकादशीला महापूजेला नेमकं कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना बोलवावं असा पेच मंदिर समितीला पडला होता.
अखेर तिढा सुटला! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा
Published on

सालाबादाप्रमाणे आषाढीला पंढपूर येथील विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. तर कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. यंदा मात्र दोन उपमुख्यमंत्री असताना कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा कोण करणार असा पेच प्रसंग पडला होता. कार्तिकी एकादशीला महापूजेला नेमकं कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना बोलवावं असा पेच मंदिर समितीला पडला होता.

असं असताना राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असल्याने. मराठा समाजाकडून पंढरपूरात मराठा समाजाकडून आंदोलन केलं जात होतं. दरम्यान, मराठा समाजाने आपलं हे आंदोलन मागे घेतलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा होणार आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस हे अर्धा तास आंदोलकांना भेटून चर्चा देखील करणार आहेत.

मराठा आंदोलक गणेश महाराज जाधव यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे. आंदोलकांना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीला बोलावले होते. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन मराठा समाजाच्या पाच मागण्या मान्य झाल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in