अलिबागमध्ये PNP नाट्यगृहात अग्नितांडव

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नाट्यगृहात वेल्डिंगचे काम सुरू होते, त्यामुळे ही घटना
अलिबागमध्ये PNP नाट्यगृहात अग्नितांडव

अलिबाग, 15 जून : अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, या आगीत नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले आहे.

अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाला आज संध्याकाळी आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररुप घेत नाट्यगृहाला विळखा घातला. संपूर्ण नाट्यगृहात आगीचा भडका उडाला आहे. त्यामुळे दूर पर्यंत धुराचे लोट दिसून येत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्ठळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नाट्यगृहात वेल्डिंगचे काम सुरू होते, त्यामुळे ही घटना घडली, असं सांगितलं जात आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in