
पहाटे ५ च्या दरम्यान दादरमधील छबिलदास शाळेच्या अक्षिकर ताम्हाणे कम्युनिटी हॉलमध्ये ४ सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये ३ कामगार जखमी झाले असून तातडीने त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट इतका भयानक होता की, शाळेच्या खिडक्यांच्या काचादेखील फुटल्या. स्फोट झाल्यानंतर त्याठिकाणी आगदेखील लागली होती. मात्र, पोलिसांच्या मदतीने अग्निशामक दलाला ही आग विझवण्यात यश आले.
सिलेंडर स्फोटामुळे शाळेमधील सामानाचे आणि वास्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सिलेंडर स्फोटामुळे शाळेतील सामना बाजूच्या रस्त्यावर आणि शाळेच्या आवारात पडले. शाळेच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. दरम्यान शाळेला सुट्टी असल्याने मोठी हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. पालिकेच्या एफ नॉर्थ विभागाने याची पाहणी केली असून या इमारतीचा काही भाग धोकादायक भाग पाडण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.