Nashik : इगतपुरीच्या जिंदाल कंपनीत भीषण आग; १ मृत्यू तर १४ जखमी

नाशिकच्या (Nashik) इगतपुरीमधील जिंदाल कंपनीमध्ये केमिकल असल्याने होत आहेत स्फोट; आग विझवण्यासाठी घेतली जातेय केंद्राची मदत
Nashik : इगतपुरीच्या जिंदाल कंपनीत भीषण आग; १ मृत्यू तर १४ जखमी
@ANI

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकमधून (Nashik) एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावमध्ये असणाऱ्या जिंदाल कंपनीला मोठी आग लागली. अंदाजे सकाळी कंपनीमध्ये स्फोट झाला, त्यानंतर भीषण आग लागली. या आगीमध्ये एका महिला कामगाराचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल व पोलिस अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह केंद्रीय मंत्री भारती पवार यादेखील उपस्थित आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जिंदाल पॉलिफिल्म्स या कंपनीला आग लागल्यानंतर मोठे स्फोट ऐकू आले. कंपनीत असलेल्या एका केमिकलमुळे हा स्फोट झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरीही अद्याप आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही. अधिकृतरित्या ही आग कशामुळे लागली? याची माहिती देण्यात आलेली नाही. सध्या या कंपनीमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. या कंपनीमध्ये एक हजाराहून अधिक लोक काम करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in