'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर अग्नितांडव! ताबा सुटल्याने केमिकल टँकरचा अपघात, आगीत होरपळून चौघांचा मृत्यू

या टँकरलला लागलेल्या आगीने ब्रीज खालच्या गाड्यांना देखील आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे.
'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर अग्नितांडव! ताबा सुटल्याने केमिकल टँकरचा अपघात, आगीत होरपळून चौघांचा मृत्यू
Published on

'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर खंडाळा घाटात एका टँकरचा अपघात झाला आहे. यात टँकरला आग लागल्याने त्यात चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या टँकरलला लागलेल्या आगीने ब्रीज खालच्या गाड्यांना देखील आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघातग्रस्त टँकर ऑईल घेऊन जाणारा असल्याने जास्त आग भडकली तसेच रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर ऑईल पसरले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर केमिकल वाहून नेणाऱ्या टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर स्लिप झाला, यामुळे टँकर रस्त्यावर आडवा झाल्याने त्यातील केमिकल रस्त्यावर पसरले. यामुळे टँकरला आग लागली. यावेळी खालील मार्गावर काम करणाऱ्या चार व्यक्तींच्या अंगावर हे केमिकल पडले. तसेच ब्रीज खालील गाड्यांवर केमिकल पडल्याने ब्रीज खालच्या गाड्यांना देखील आग लागली आहे. ही आग विझवायला अग्निशमन दलाच्या गाड्यांची आवश्यकता असताना IRB यंत्रणेकडून पाण्याच्या टँकरने आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. या घटनेत किरकोळ जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या केमिकल टँकरला लागलेली आग एवढी भीषण होती की ब्रिजच्या वर लागेल्या आगीच्या झळा या ब्रिजच्या खाली देखील बसत होत्या. यावेळी ब्रीज खाल्याच्या २-३ गाड्यांना देखील आग लागली. आग लागलेल्या टँकरमध्ये केमिकल असल्याने त्याचा स्फोट होण्याची देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दरम्यान पावसाने हजेरी लावल्याने आग आटोक्यात आली. यानंतर पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. मात्र, मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक अजूनही बंदच ठेवण्यात आली आहे.

टँकरला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून या चौघांना तात्काळ मदत करण्यात आली. मात्र दुर्दैवाने त्यांना मृत्यू झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्यांना रुग्णवाहिकेतू रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या आगीत आणखी कोणी अडकले आहे का? याचा शोध घेतला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in