पहिल्या टप्प्याचे काम ८७ टक्के पूर्ण ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आढावा

कफ परेड ते सीप्झ दरम्यान प्रस्तावित असलेल्या या मेट्रो मार्गाचे सद्यस्थितीत काम प्रगतीपथावर आहे
File photo
File photo
Published on

मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो रेल महत्वपूर्ण ठरणार असून भारतातील सर्वांत लांबीची भुयारी मेट्रो ३ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे ८७.२ टक्के काम पूर्ण झाले आहे. भुयारी मेट्रो ३ रेल्वेने २०३१ मध्ये दररोज १७ लाख प्रवासी प्रवास करतील असे नियोजन केले आहे. तर एका गाडीची अडीच हजार प्रवासी क्षमता असूनही तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. तर दोन गाड्या पुढील आठ ते दहा दिवसांत मुंबईत दाखल होतील. तसेच बीकेसी ते आरे कॉलनी पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत प्रवासी सेवेत दाखल होईल. मुंबई मेट्रो रेल ही मुंबईची जीवन रेषा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.‌ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मार्फत सुरू असलेल्या मुंबई मेट्रो लाईन ३ या भूमिगत प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशीरा आढावा घेतला.

यावेळी त्यांच्यासोबत प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई मेट्रो रेलचे संचालक सुबोध गुप्ता आणि इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. कफ परेड ते सीप्झ दरम्यान प्रस्तावित असलेल्या या मेट्रो मार्गाचे सद्यस्थितीत काम प्रगतीपथावर आहे. मेट्रो ३ सारखा तांत्रिकदृष्ट्या कठीण प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान कॉर्पोरेशनचे अधिकारी लीलया पेलत असल्याचे म्हणत शिंदे यांनी एमएमआरसीएलच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, मुंबई मेट्रो रेलच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वाखाली मेट्रो रेल प्रकल्पाचे काम सुरु आहे.

logo
marathi.freepressjournal.in