१ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी

राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी करण्यास बंदी लागू करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने दिले
१ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी

राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी करण्यास बंदी लागू करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने दिले आहेत.

मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांचे जीवित व वित्त यांचे रक्षण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ च्या कलम ४ च्या पोट कलम १ द्वारे प्राप्त अधिकारांचा वापर करून दि. १ जून ते ३१ जुलैदरम्यान जल क्षेत्रात मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी घालण्यात आलेली आहे. ही बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यंत्रचलित नौकांना लागू राहणार नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in