जळगावात भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू

जळगावात भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू

जळगाव जिल्ह्यात रस्त्यावर बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध भरत असताना भरधाव वेगाने आलेल्या एकापाठोपाठ चार ते पाच वाहनांनी टँकरला धडक दिली. या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावजवळ शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावपासून दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. यामुळे टँकरच्या मालकाने घटनास्थळी दुसरा टँकर बोलावला. या ठिकाणी बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू केले. यासाठी एक क्रेनदेखील बोलावण्यात आली होती.

यानुसार दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू असताना अंधारात वाहने न दिसल्याने समोरून भरधाव वेगाने टाईल्सने भरलेला ट्रक, त्या पाठोपाठ दोन कार अशा चार ते पाच भरधाव वाहनांनी दोन्ही महामार्गावर उभ्या टँकर्स आणि क्रेनला धडक दिली. यात बंद पडलेल्या टँकरमधील तीन जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in