वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा

सातारा जिल्ह्यात ३५ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह मंगळवारी, १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारीअखेर पर्यंत राबविण्यात येणार आहे.
वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा

कराड : रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने चालकांनी वाहतूकीच्या नियमांचे तंतोतंत पालन केल्यास अपघात टाळता येतात. रस्ते अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घ्यावी.प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी गेल्या वर्षभरात केलेल्या अंमलबजावणीने तब्बल ४ टक्के अपघातांचे प्रमाण कमी झाले झाल्याचे प्रतिपादन सातारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले.

सातारा जिल्ह्यात ३५ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह मंगळवारी, १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारीअखेर पर्यंत राबविण्यात येणार आहे.या सप्ताहाचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी सातारच्या सैनिक स्कूलमधील डहाणूकर हॉलमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधिक्षका ऑंचल दलाल, सैनिक स्कूलचे प्राचार्य कॅप्टन के. श्रीनिवासन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थित सैनिक स्कूलच्या विद्यार्थी, नागरिकांनी रस्ता सुरक्षा शपथ घेतली.

सातारा डिलर असोसिएशनचे प्रतिनिधी अभिजित पिसाळ, ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी प्रशांत पोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in