"मराठा आरक्षण मिळेपर्यंत आमचा कोणताही पक्ष नाही", आरक्षणाच्या मागणीसाठी सलग तिसऱ्या दिवशी आमदारांचं मंत्रालयाबाहेर आंदोलन

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
"मराठा आरक्षण मिळेपर्यंत आमचा कोणताही पक्ष नाही", आरक्षणाच्या मागणीसाठी सलग तिसऱ्या दिवशी आमदारांचं मंत्रालयाबाहेर आंदोलन

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी हिंसक पवित्रा घेतला आहे. आरक्षणाचा मोर्चा आता मुंबईत येऊन धडकला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं, उपोषणं सुरुचं आहे. अशातच मुंबईत मंत्रालयाच्या गेटवर सर्वपक्षीय आमदारांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी या आमदारांनी आंदोलन केलं आहे.

आंदोलन करणाऱ्या या आमदारांना आता मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी हे आमदार आक्रमक झाले आहेत. मंत्रालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. मात्र, हा अतिशय संवेदनशील परिसर आहे. तसंच जवळच असलेल्या वानखेडे स्टेडियममध्ये आज भारत आणि श्रीलंके या संघात सामना रंगणार आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलिसांनी आमदरांना ताब्यात घेतलं. यावेळी या आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली आहे. 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत या आमदारांनी परिसर दणाणून सोडला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आमदारांनी मंत्रालय परिसरात आंदोलन केलं. मंत्रालयाला या आमदारांकडून रास्ता रोको करण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलवा, अशी मागणी या आमदारांनी केली आहे. आंदोलन करणाऱ्या या आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा यावेळी या आमदारांनी दिल्या आहेत. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझा पक्षचं नाही, अशी प्रतिक्रिया आमदार राजू नवघरे यांनी दिली आहे. तर सरकार फक्त वेळ काढूपणा करत आहे, अधिवेशन का बोलावत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in