खटाव येथील येरळवाडीत आले गुलाबी पंखाचे परदेशी पाहुणे; पक्षी निरीक्षकांसह पर्यटकांचा आनंद द्विगुणित

सध्याची गुलाबी थंडी अनेकांना बोचरी वाटत असली तरी काही पशु, पक्षी, प्राण्यांसाठी ती प्रतिक्षेची ठरते. यातीलच गुलाबी फ्लेमिंगोचे (रोहीत, अग्निपंख) पक्षांसाठी खटाव तालुक्यात वाढत्या गुलाबी थंडीची फार मोठी उत्सुकता असते.
खटाव येथील येरळवाडीत आले गुलाबी पंखाचे परदेशी पाहुणे; पक्षी निरीक्षकांसह पर्यटकांचा आनंद द्विगुणित

रामभाऊ जगताप/कराड

सध्याची गुलाबी थंडी अनेकांना बोचरी वाटत असली तरी काही पशु, पक्षी, प्राण्यांसाठी ती प्रतिक्षेची ठरते. यातीलच गुलाबी फ्लेमिंगोचे (रोहीत, अग्निपंख) पक्षांसाठी खटाव तालुक्यात वाढत्या गुलाबी थंडीची फार मोठी उत्सुकता असते. सध्या जस जशी थंडी वाढत जात आहे तसे या परदेशी पाहुण्यांची याठिकाणांची हजेरीही वाढू लागली आहे. वाढत्या थंडीबरोबरच चार ग्रेटर, तर तीन जूवेनाइल अर्थात तारूण्य अवस्थेतील परदेशी पाहुण्या गुलाबी फ्लेमिंगो पक्षांचे (रोहीत,अग्निपंख) येरळवाडी (ता.खटाव) मध्यम प्रकल्पातील पाणथळीच्या भागात आगमन झाले आहे. वाढत्या गुलाबी थंडीबरोबर तलावात दाखल होणाऱ्या लाडक्या परदेशी पाहुण्या पक्षांची वाट पक्षी निरीक्षक, पक्षीप्रेमी व पर्यटक पाहत होते. आतात्यांच्या हजेरीमुळे पक्षीमित्रांच्या आनंदाला उधाण आले आहे.

खटाव तालुक्यात येरळवाडी, मायणी, कानकात्रे व सुर्याचीवाडी तलाव हे रोहीत पक्षांचे गुलाबी थंडीतील मुख्य वास्तव्याची ठिकाणे आहेत,तसं पाहता हे परदेशी पाहुणे असलंयाने व त्यांची मूळ वास्तव्याची ठिकाणे पेरू, चिली, मंगोलीया,सरबेरिया,बोलिव्हिया आणि अर्जेंटिनाच्या उच्च अँडिज रांगांत तर भारतात कच्छच्या रणात फ्मेमिंगो मोठ्या प्रमाणात आढळतात; मात्र येथील त्यांची आगमने ही अगदी अल्पकाळ असतात,त्यातही पक्षांचे आपल्या देशातील वास्तव्याची अगदी दुर्मिळ ठिकाणे आहेत. यातील सुर्याचीवाडी तलावात अपूरा पाणीसाठी असल्याने येरळवाडी तलावात सात फ्लेमिंगोने हजेरी लावली आहे. त्यांच्या पेरू, चिली, मंगोलीया, बोलिव्हिया आणि अर्जेंटिनाच्या उच्च अँडिज रांगांतील तर भारतात कच्छच्या रणात मोठ्या प्रमाणात आढळणारे फ्मेमिंगो या भागात पडणाऱ्या कडाक्याच्या व बोचऱ्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कमी थंडीच्या म्हणजेच दुष्काळी तालुक्यात हे पक्षी हजेरी लावतात.

येथील खटाव तालुक्यातील वडूजपासून सात ते आठ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या येरळवाडी तलावात सात फ्लेमिंगो दाखल झाले आहेत.त्यातील चार हे ग्रेटर फ्लेमिंगो व तीन तरूण अर्थात जुवेनाईल पक्षांचे आगमन झाले आहे. दरवर्षी हे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हे पक्षी खटाव -माणच्या तलावावर दाखल होतात. यावर्षीही त्यांनी हजेरी लावल्याने अनेकांना ती पर्वणीच ठरत आहे.

वाढत्या थंडीमुळे तलावात सात पाहुणे फ्लेमिंगो पक्षी आले आहेत. त्यात चार ग्रेटर तर तीन जुवेलीन (तरून) फ्लेमिंगो आहेत. ग्रेटर फ्लेमिंगोंसोबत लहान पक्षी आल्यामुळे त्यांना हवाईमार्गही ज्ञात करुन दिला आहे. त्यामुळे पक्षी पर्यटनाला चांगले दिवस येतील.

- अंकुश चव्हाण, पक्षी निरीक्षक व पक्षी संशोधक

यामुळे मिळाले अग्नीपंख नाव!

हे पक्षी सुमारे चार ते पाच फूट लांबीचे असतात. गुलाबी पाय, बाकदार इंग्रजीतील ‘एस‘ आकारासारखी मान, वरुन पांढरा रंग आतून गुलाबी पंखाचा रंग असणारे फ्लेमिंगो जेव्हा हवेत झेप घेतात तेव्हा ते अग्निज्वाळा हवेत जात आहेत असे दृश्य दिसते. त्यामुळे हे पक्षी फ्लेमिंगोसह अग्नीपंख नावानेही ओळखले जातात.

logo
marathi.freepressjournal.in