उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भाजपचे माजी आमदार संजय देशमुखांचा सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश

गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजकारणाशी संबंधित नसलेले, तसेच विविध धर्माचे लोकही आमच्यासोबत येत आहेत
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भाजपचे माजी आमदार संजय देशमुखांचा सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश
Published on

यवतमाळ जिल्ह्याचे माजी राज्यमंत्री आणि दिग्रसचे माजी आमदार संजय देशमुख यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भाजपचे माजी आमदार संजय देशमुख यांनी सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. संजय राठोड आणि भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, यवतमाळ आणि आर्णी मतदारसंघात संजय देशमुख यांची मोठी ताकद आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजकारणाशी संबंधित नसलेले, तसेच विविध धर्माचे लोकही आमच्यासोबत येत आहेत. तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाण्यात जाहीर सभा होणार आहे. पोहरदेवीच्या दर्शनाला यायचे आहे, तुम्ही तारीख ठरवा, मी येईन, असे उद्धव ठाकरे म्हणाले. घाईघाईने निवडणूक आयोगाकडे जाऊन आमचे नाव आणि चिन्ह गोठवले. ठीक आहे पण मी माझे नाव आणि चिन्ह घेऊन पुढे जात आहे. जे सोडून गेले ते स्वबळावर लढले नाही, त्यांनी भाजपचा आधार घेतला.

logo
marathi.freepressjournal.in