BREAKING NEWS : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती खालावली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

जोशी यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे.
BREAKING NEWS : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती खालावली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल
Published on

राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्री त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहीम येथील हिंदुजा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. जोशी यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. लवकर हिंदुजा रुग्णालयाकडुन याबाबतची अधिकृत माहिती दिली जाणार आहे. मनोहर जोशी यांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे जोशी यांची विचारपूस करण्यासाठी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह हिंदुजा रुग्णालयात गेले होते.

logo
marathi.freepressjournal.in