सर्वोच्च न्यायालयाकडून रश्मी बर्वे यांची निराशा

रामटेक मतदारसंघातून काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द ठरवले होते. त्यामुळे बर्वे यांचा लोकसभा उमेदवारी अर्जही रद्द झाला होता.
सर्वोच्च न्यायालयाकडून रश्मी बर्वे यांची निराशा

नवी दिल्ली : काँग्रेसच्या रामटेक मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांच्या पदरी सर्वोच्च न्यायालयाकडूनही निराशाच पडली आहे. बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्याविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

रामटेक मतदारसंघातून काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द ठरवले होते. त्यामुळे बर्वे यांचा लोकसभा उमेदवारी अर्जही रद्द झाला होता. समितीच्या या निर्णयाविरुद्ध बर्वे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समितीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली होती. त्यानंतर बर्वे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बर्वे यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. दरम्यान, रामटेक मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीबाबत शंका निर्माण झाल्याने आता बर्वे यांचे पती रिंगणात उतरणार असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in