सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक महेबूब पानसरे यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या

मेब्बूब पानसरे हे राष्ट्रवादीच्या खासदार आणि कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात
सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक महेबूब पानसरे यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या

जेजुरी नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक महेबूब पानसरे यांची चार ते पाच जणांनी कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेबूब पानसरे यांच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला होता. या घटनेत पानसरे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शेतजमिनीच्या वादातून पानसरे यांची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, मेब्बूब पानसरे हे राष्ट्रवादीच्या खासदार आणि कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in