(Video) मनोहर जोशी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर दादर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
(Video) मनोहर जोशी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर आज (दि.23) सायंकाळच्या सुमारास दादर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुपारी 2 वाजेनंतर रुपारेल कॉलेजजवळील त्यांच्या निवासस्थानापासून स्मशानभूमीपर्यंत काढलेल्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी झाली होती.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह राज्यातील जवळपास सर्वच राजकीय पक्षाची नेते मंडळी जोशी यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.

जोशी यांनी मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान अखेरचा श्वास घेतला. बुधवारी (दि. 21 फेब्रुवारी) त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये दाखल केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. सच्चा शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in