माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बबनराव ढाकणे हे गेल्या तीन आठवड्यापासून न्युमोनिया आजारानं ग्रस्त होते. त्यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने गुरुवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आहे. यात त्यांचं निधन झालं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
बबनराव ढाकणे यांच्यावर अहमदनगरच्या साईदीप रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ढाकणे हे चार वेळा आमदार तर एकवेळा खासदार होते. त्यांनी राज्यात तसंच केंद्रात मंत्रीपदं भूषवलं होतं. त्यांचं पार्थिव आज अहमदनदरच्या पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहात आज दुपारी एक ते उद्या दुपारी एक वाजेपर्यंत अंतदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी २ वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
बबनराव ढाकणे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९३७ साली महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. जनता दलातर्फे बीड लोकसभेतून ते निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही सहभाग घेतला होता. बबनराव ढाकणे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जामंत्री होते.