काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या; घटनेने लातूर हादरले

काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाने लातूरमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली.
काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या; घटनेने लातूर हादरले
Published on

लातूरमध्ये एका घटनेने मोठी खळबळ माजली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे भाऊ चंद्रशेखर पाटील यांनी आत्महत्या केली. आज सकाळी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलेले. शिवराज पाटील यांच्या देवघरमधील निवासस्थानी चंद्रशेखर पाटील यांनी स्वत: वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. अद्याप या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस पुढचा तपास करत आहेत.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या घरी चंद्रशेखर उर्फ हणमंत पाटील यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याने लातूरमध्ये खळबळ उडाली. त्यांचे वय ८१ वर्ष असून ते शेती करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर पाटील यांच्याकडे बंदुकीचा परवाना देखील होता. गेले काही दिवस ते किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याचेदेखील सांगण्यात आले आहे. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी काही जवळच्या व्यक्तींना 'गूड बाय' असा मॅसेज केल्याचेही समोर आले.

logo
marathi.freepressjournal.in