पुण्यातील चार विद्यार्थीनींचा देवगडच्या समुद्रात बुडून मृत्यू; एका तरुणाला वाचवण्यात यश तर एक अद्याप बेपत्ता

पुणे देथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल देवगड येथे आली होती.
पुण्यातील चार विद्यार्थीनींचा देवगडच्या समुद्रात बुडून मृत्यू; एका तरुणाला वाचवण्यात यश तर एक अद्याप बेपत्ता

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील समुद्रात चार मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका जणाला वाजवण्यात यश आलं असून एक मुलगा अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरु आहे. पुणे देथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल देवगड येथे आली होती. यावेळी हे सहा जण पाण्यात उतरले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली.

या दुर्घटनेत प्रेरणा डोंगरे, अंकिता गाटले, अनिषा पडवळ, पायल बनसोडे या चार तरुणींचा मृत्यू झाला आहे. तर आकाश तुपे नावाच्या तरुणाला वाचवण्यात यश आलं आहे. राम डिचवलकर नावाचा तरुण अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.

देवगड येथील समुद्र किनारा हा खोल नसुन हा पर्यटकांसाठी सर्वात सुरक्षित समुद्र किनारा मानला जातो. पाण्याचा अंदाज न आल्याने आणि अतिउत्साह दाखवल्याने ही दुर्घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे. खोल समुद्राने गेल्याने आणि लाटांमध्ये अडकल्याने पर्यटक बुडतात. आज घडलेली दुर्घटना ही देवगडच्या समुद्रात घडलेली सर्वात मोठी दुर्घटना असल्याचं बोललं जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in