साताऱ्यातील चार आमदार झाले मंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूरच्या राजभवनात पार पडला.
जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, शंभूराज देसाई (डावीकडून)
जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, शंभूराज देसाई (डावीकडून)
Published on

कराड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूरच्या राजभवनात पार पडला. हिवाळी अधिवेशन उद्या १६ डिसेंबरपासून सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी सोहळा घेण्यात आला होता. विशेष म्हणजे या विस्तारीत मंत्रिमंडळात साताऱ्यातील आठ आमदारांपैकी चार आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण उत्साही बनले आहे.

नव्याने सामील झालेल्या मंत्रिमंडळात भाजपकडून साताऱ्याचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी शपथ घेतली. शिवेंद्रराजे भोसले हे २०१९ मध्ये सातारा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते आता पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आलेत. त्यांना यावेळी भाजप पक्षाने मंत्रिपदाची संधी दिली आहे. तसेच माणखटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांना यावेळी भाजपने संधी दिली असून त्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचे मंत्रिपद कायम ठेवण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून वाई, महाबळेश्र्वर आणि खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे आ. मकरंद पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान चौघांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडल्याने साताऱ्यात आनंदाचे वातावरण आहे.

logo
marathi.freepressjournal.in