चार वर्षाच्या मुलीचा झोपेत साप चावुन मृत्यू

डॉक्टरानी मृत घोषीत केले
चार वर्षाच्या मुलीचा झोपेत साप चावुन मृत्यू

नांदेड : चार वर्षाच्या मुलीचा झोपेत विषारी साप चावुन मृत्यू झाल्याची नांदेड मधील कौठा भागात घडली. वैशु मोहन कदम (४ वर्ष) असे मृताचे नाव आहे. कौठा भागातील संतोषी माता मंदीराजवळ राहणारे मोहन नामदेव कदम हे व्यवसायाने मजुरी करतात.दरम्यान, त्यांच्या राहत्या घरी १४ जुलै रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास त्यांची मुलगी वैशु मोहन कदम (वय ४) ही रात्री पलंगावर झोपलेली असताना तिच्या उजव्या दंडास विषारी साप चावला. तिस उपचार कामी विष्णुपुरी येथील सरकारी दवाखाना येथे दाखल केले असता डॉक्टरानी तिला मृत घोषीत केले. याप्रकरणी मोहन नामदेव कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in