फ्रान्सच्या सेंद्रिय शेती अभ्यासिकेची दुष्काळग्रस्त गावांना भेट; जलसंधारणाच्या कामांची केली पाहणी

फ्रान्सच्या सेंद्रिय शेती अभ्यासिकेची दुष्काळग्रस्त गावांना भेट; जलसंधारणाच्या कामांची केली पाहणी

दुष्काळी तालुक्यांना पाण्याची भासत असलेली टंचाई तसेच त्याबाबत शासन, ग्रामस्थांकडून नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत

कराड : फ्रान्समध्ये सेंद्रिय शेतीचा अभ्यास करणाऱ्या व फ्रान्स येथून सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी तालुक्या तील गावांमध्ये अभ्यासासाठी आलेल्या केरीलीना यांनी गेल्या शुक्रवारी, १६फेब्रुवारीपासून सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी तालुक्यातील गावांना भेट येत तेथील दुष्काळी भागांची पाहणी केली. तसेच जलसंधारणाची कामे करणाऱ्या काही गावांना देखील भेटी दिला. यावेळी त्यांनी येथील दुष्काळी तालुक्यांना पाण्याची भासत असलेली टंचाई तसेच त्याबाबत शासन, ग्रामस्थांकडून नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याची माहिती देखील घेतली.

दरम्यान, केरीलीना यांनी पाणी फाउंडेशनच्याद्वारे आयोजित केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आणि फार्मर कप स्पर्धा यामध्ये काम करणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील वेळू गाव जे २०१६ मध्ये राज्याचे प्रथम पाणी फाउंडेशनमधील विजेते मिळवलेले आहे, खटाव तालुक्यातील भोसरे गाव ज्याने २०१७ मध्ये द्वितीय क्रमांक विजेता मिळवलेले आहे, खटाव तालुक्यातील वरुड आणि तरसवाडी या दोन गावांना भेटी दिल्या.

वेळू गावास ज्यावेळी फ्रान्सच्या अभ्यासिका श्रीमती केरीलीना यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, सुखदेव भोसले, सरपंच दुर्योधन ननावरे, उपसरपंच वैभव भोसले, माजी सरपंच पूनम प्रवीण भोसले, प्रवीण भोसले तसेच गामपाच्यात सदस्य माधुरी भोसले, राहुल मगर, काकासो जगताप आदींसह ग्रामस्थ आणि महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in