बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांना पुढील शिक्षण मोफत

बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ मुला-मुलींसाठी पुढील शिक्षण राज्य सरकारतर्फे मोफत देण्यात येईल, असा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन कॅबिनेटमध्ये मांडला व या विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तो मंजूर करून घेतला.
बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांना पुढील शिक्षण मोफत
Published on

मुंबई : बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ मुला-मुलींसाठी पुढील शिक्षण राज्य सरकारतर्फे मोफत देण्यात येईल, असा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन कॅबिनेटमध्ये मांडला व या विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तो मंजूर करून घेतला. या निर्णयामुळे बालगृहातून बाहेर पडणाऱ्या संस्थात्मक आणि संस्थाबाह्य मुलांसाठी पुढील शिक्षण मोफत असणार आहे. या निर्णयाचे राज्यामध्ये सर्व स्तरांमध्ये स्वागत केले जात आहे.

मागील ६ वर्षांपासून बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या व त्यांच्यासाठी संघर्ष करणाऱ्या तर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष व भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनीदेखील राज्य सरकारच्या या संवेदनशील निर्णयाचे स्वागत केले आणि त्यांचे आभार मानले आहे. हा निर्णय अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या कित्येक सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. हजारो नवयुवक दरवर्षी अनाथालयातून बाहेर पडतात. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा दिवस आहे.

मागील कित्येक वर्षांपासून बालगृहातून बाहेर पडणारा प्रत्येक मुलगा या निर्णयाची वाट पाहत होता. या मुलांना फक्त शिक्षण हवे आहे. पण जर १८ वर्षांपर्यंत बालगृहामध्ये मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकार घेत असेल तर १८ वर्षानंतर बालगृहातून बाहेर पडणाऱ्या मुलांची जबाबदारी सरकार का घेऊ शकत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन हा निर्णय कॅबिनेटमध्ये मांडला व मंजूर करून घेतला.

logo
marathi.freepressjournal.in