स्वातंत्र्यसैनिक पेन्शन योजना कुटुंबियांसाठी वरदान; दोन वर्षांत १८५ कोटींचा निधी वितरित

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी लढा दिला, त्या स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी स्वतंत्र सैनिक पेंशन योजना अंमलात आणली आहे.
स्वातंत्र्यसैनिक पेन्शन योजना कुटुंबियांसाठी वरदान; दोन वर्षांत १८५ कोटींचा निधी वितरित
Published on

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी लढा दिला, त्या स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी स्वतंत्र सैनिक पेंशन योजना अंमलात आणली आहे. या योजनेंतर्गत २०२२ - २३ व २०२३ - २४ या वर्षांत ९,४८५ स्वतः सैनिक किंवा त्यांच्या कुटुंबियांना स्वातंत्र्यसैनिक पेंशन योजने पोटी १८५ कोटी ८० लाख ८ हजार ९७१ रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आल्याचे राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून सांगण्यात आले.

१८ ऑक्टोबर १९६५ अन्वये स्वातंत्र्य सैनिकांना राज्य शासनाकडून दरमहा ५० रुपये इतके निवृत्तिवेतन देण्यात येत होते. यामध्ये वेळोवेळी वाढ होऊन २२ नोव्हेंबर २०२२ अन्वये माहे नोव्हेंबर, २०२२ पासून स्वातंत्र्य सैनिकांना त्यांच्या पती, पत्नी यांना २० हजार रुपये इतके निवृत्तिवेतन मंजूर करण्यात आले आहे.

त्या योजनेनुसार निवृत्ती वेतनाचा निधी वितरित करण्यात आला आहे.

केंद्र शासनाकडून केंद्रातील स्वातंत्र्य सैनिकांना १ जानेवारी २०२३ पासून सुधारीत निवृत्तीवेतन देय असून, सुधारीत मुळ निवृत्तीवेतन ३६,४०० रुपये इतके आहे.

केंद्र शासनाचे निवृत्तीवेतन हे खुद्द स्वातंत्र्य सैनिकास व त्यांच्या मृत्यु पश्च्यात त्यांच्या जोडीदारास, अविवाहित अथवा बेरोजगार मुलीस देणे बंधनकारक आहे.

logo
marathi.freepressjournal.in