"काँग्रेसची बँक खाती गोठवणे घटनाबाह्य, आम्ही जनतेला विनंती करतो की..."; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

आम्ही न्यायालयात न्याय मागणार आहोत, पण लोकसभा निवडणुकीनंतर निकाल आल्यास त्याचा काही उपयोग होणार नाही. आम्ही जनतेला विनंती करतो की...
"काँग्रेसची बँक खाती गोठवणे घटनाबाह्य, आम्ही जनतेला विनंती करतो की..."; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
(संग्रहित छायाचित्र)

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी सांगितले की, पक्षाची बँक खाती गोठवण्याची केंद्र सरकारची कारवाई घटनाबाह्य आहे. खाती गोठवल्यामुळे त्यांचा पक्ष लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराशी संबंधित खर्चासाठी निधी मिळवू शकला नाही. याप्रकरणी निवडणूक आयोगाने हस्तक्षेप केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

चव्हाण यांनी दावा केला की, चार बँकांमधील काँग्रेसची ११ खाती आयकर विभागाने गोठवली आहेत. त्यामुळे पक्षाला कर्मचाऱ्यांचे पगार, नेत्यांचा प्रवास खर्च, उमेदवारांना निधी देणे किंवा वृत्तपत्रे आणि मीडिया चॅनेलमध्ये जाहिरात करणे शक्य झाले नाही. १९९४ पासूनच्या कराच्या पुनर्मूल्यांकनाबाबत खाती गोठवल्याने केवळ काँग्रेसच नव्हे तर लोकशाहीचाही गळचेपी होत आहे. यातून केंद्र सरकार अन्यायकारक व्यवहार करत असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. यात निवडणूक आयोगाने हस्तक्षेप केला नाही हे दुर्दैवी आहे. ही खाती गोठवणे घटनाबाह्य आहे. आम्ही न्यायालयात न्याय मागणार आहोत, पण लोकसभा निवडणुकीनंतर निकाल आल्यास त्याचा काही उपयोग होणार नाही. आम्ही जनतेला विनंती करतो की, त्यांनी या निवडणुकीची जबाबदारी स्वीकारावी. आम्हाला थोडेफार योगदान द्यावे आणि देशाला हुकूमशाहीकडे जाण्यापासून वाचवावे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in