पद्मदुर्गच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही; तातडीने जेट्टी उभारण्याचे खासदार तटकरे यांचे आदेश

रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी पद्मदुर्ग किल्ल्याला भेट देऊन प्रत्यक्ष पहाणी केली व उपस्थित अधिकारी वर्गाला पद्मदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांना सहज उतरता यावे यासाठी तातडीने जेट्टीची उभारणी करण्याचे आदेश दिले.
पद्मदुर्गच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही; तातडीने जेट्टी उभारण्याचे खासदार तटकरे यांचे आदेश

मुरूड-जंजिरा : रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी पद्मदुर्ग किल्ल्याला भेट देऊन प्रत्यक्ष पहाणी केली व उपस्थित अधिकारी वर्गाला पद्मदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांना सहज उतरता यावे यासाठी तातडीने जेट्टीची उभारणी करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी कोणताही निधी कमी पडू देणार नसून, अधिकारी वर्गाने तातडीने प्रस्ताव तयार करून संबंधित खात्याकडे पाठवा त्याचा मी स्वतः पाठपुरावा करून निधी व कामाची मान्यता आणून देईन, असे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे.

पद्मदुर्ग किल्ल्याला प्रथमच खासदार सुनील तटकरे यांनी भेट देऊन एक नवा इतिहास रचला आहे. याअगोदर असणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री यांनी कधी ही या किल्ल्याला भेट दिली नव्हती किंवा या किल्ल्याविषयी कोणतीही आस्था दाखवली नव्हती. परंतु खासदार तटकरे यांनी स्वतः पुरातत्त्व अधिकारी व मेरी टाइम बोर्ड अधिकारी यांच्यासमवेत भेट देत किल्याच्या विकासाचा मार्ग मोकळा केला आहे. या भेटीत त्यांच्यासमवेत आमदार महेंद्र दळवी, मुंबई विभागाचे पुरातत्व खात्याचे अधीक्षक शुभम मुजुमदार, महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाचे उपअभियंता डी. वाय. पवार व मुरुड पुरातत्व खात्याचे प्रमुख बजरंग एलीकर हे सर्व अधिकारी त्याचप्रमाणे राष्ट्रवादी पक्षाचे नेते अतिक खतीब, मुरूड तालुका अध्यक्ष फैरोज घलटे, माजी सभापती स्मिता खेडेकर, सचिव विजय पैर, मुरूड शहर शिवसेना अध्यक्ष संदीप पाटील, पर्यटन महोत्सव अध्यक्षा कल्पना पाटील, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संजय गुंजाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य सुबोध महाडिक, सिने अभिनेत्री तनुजा गोबरे, जिल्हा उप प्रमुख भरत बेलोसे, आदी मान्यवर उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in