सध्याचे राजकारण येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागणार, आ. सत्यजीत तांबे यांचे विधान

सध्याच्या राज्यातील राजकारणावर विचारता सध्याचे जे राजकारण सुरू आहे ते पाहता माझी पिढी आणि येणाऱ्या पिढ्यांना....
सध्याचे राजकारण येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागणार, आ. सत्यजीत तांबे यांचे विधान

जळगाव : सध्याच्या राज्यातील राजकारणावर विचारता सध्याचे जे राजकारण सुरू आहे ते पाहता माझी पिढी आणि येणाऱ्या पिढ्यांना खूप काही भोगावे लागणार असल्याचे आ. सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे. जे काही घडते आहे, ते सहज होत आहे, असे वाटून लोक गप्प आहेत, कुणीच बोलत नाहीत याचे वाईट वाटते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ते जळगाव येथे एका पत्रकार परिषदेत बुधवारी बोलत होते.

या वर्षात आपण उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्हात जिल्हा युवक माहिती केंद्र (युनोव्हेशन क्लब)ची निर्मिती करून त्यात शिक्षण उद्योजकता, नोकरी व जीवनावश्यक मूल्ये यास जोडण्याचा आपला संकल्प आहे. या महत्वाकांक्षी योजनेचे २२ ठिकाणी काम प्रगतीपथावर असल्याची माहिती शिक्षक आमदार सत्यजीत तांबे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.

आ. सत्यजीत तांबे यांच्या कार्यकालास एक वर्ष पूर्ण झााले असून, आपल्या एक वर्षाच्या कालावधीच्या कामाचा लेखाजोखा ते मतदारांशी संपर्क साधून मांडत आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत यावर सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की , विधीमंडळात १९८ तारांकित प्रश्न मांडले यापैकी ७२ प्रष्न स्वीकृत झााले ,१५ अशासकीय ठराव मांडले यापैकी ६ स्वीकृत झााले, औचित्याचे ३१ मुददे मांडले यात १८ स्वीकृत झााले तर ३१ क्षवेधी सूचना मांडल्या.आपल्या प्रयत्नातून सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना त्यांच्या पसंतीच्या बँकेत पगाराचे खाते उघडता येणार असल्याचे आ. तांबे यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात पर्यटनासाठी अनेक स्थळे आहेत. जिल्ह्यातील पर्यटनास चालना देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगत जिल्ह्यातून जे याबाबत प्रस्ताव गेले यांची माहिती मागवणार असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

शाळांना फी वसुलीची परवानगी मिळणार

राज्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची वाढती संख्या, पालकांची त्यांना असलेली पसंतीमुळे मराठी शाळांतील संख्या रोडावत असल्याचे लक्षात आणून देता मराठी शाळांनी आपण स्पर्धेच्या युगात आहोत याचे भान ठेवले पाहिजे. संस्था चालकांनी असलेल्या स्पर्धेचे भान ठेवणे गरजेचे असल्याचे सांगत यासाठी शाळांची स्थिती सुधारली पाहिजे, शाळांच्या गुणात्मक दर्जावर भर देणे गरजेचे असल्याचे, त्यासाठी जिल्हा परिषद अधिकारी, नगरपालिका अधिकारी यांनी स्वत:च्या विविध कल्पना न मांडता शाळांना मार्गदर्शन, सुविधा आणि शिक्षकांना पगार दिला गेला पाहिजे, असे आ. तांबे यांनी सांगितले. शाळांना मिळत नसलेले अनुदान यामुळे ते खर्च करू शकत नसल्याचे सांगताच लवकरच शाळांना फी घेण्याचा अधिकार देणारा जी.आर. निघत असल्याची माहिती आ. सत्यजीत तांबे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in