अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; राज्यातील ६ लाख ९२ हजार ६८१ विद्यार्थ्यांना प्रवेश

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने विद्यार्थी संघटना, विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होत असतानाच, शिक्षण संचालनालयाने अखेर वेळापत्रकापूर्वीच पहिली गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर केली. या यादीत कॅप आणि कोट्यातील तब्बल ६ लाख ९२ हजार ६८१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. राज्यातील तब्बल ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; राज्यातील ६ लाख ९२ हजार ६८१ विद्यार्थ्यांना प्रवेश
Published on

मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने विद्यार्थी संघटना, विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होत असतानाच, शिक्षण संचालनालयाने अखेर वेळापत्रकापूर्वीच पहिली गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर केली. या यादीत कॅप आणि कोट्यातील तब्बल ६ लाख ९२ हजार ६८१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. राज्यातील तब्बल ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी संपूर्ण राज्यात अकराचीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार २६ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार होती. मात्र अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेशबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे प्रवेशाच्या संगणक प्रणालीमध्ये बदल करण्याची प्रक्रिया राचविण्यात आल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली. सुधारित वेळापत्रकानुसार ३० जून रोजी प्रथम यादी जाहीर करण्यात येणार होती.

मात्र विविध राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटनांनी प्रवेश वादी तातडीने जाहीर करण्याची मागणी लावून धरल्याने अखेर शिक्षण संचालनालयाने शनिवारी प्रवेशाची पहिली यादी जाहीर केली. कॅप राउंडमधील ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे, तर कोटा प्रवेशामध्ये ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. कॅप राउंडमध्ये प्रवेशासाठी १० लाख ६६ हजार ५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यापैकी ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.

कला शाखेत १ लाख ४९ हजार ७९१ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश देण्यात आला आहे. तर वाणिज्य शाखेत १ लाख ३९ हजार ६०२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. तर विज्ञान शाखेत ३ लाख ४२ हजार ८०१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.

आकडेवारी

कला शाखा : १,४९,७९१ विद्यार्थ्यांना प्रवेश

वाणिज्य शाखा : १,३९,६०२ विद्यार्थ्यांना प्रवेश

विज्ञान शाखा: ३,४२,८०१ विद्यार्थ्यांना प्रवेश

पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा ९ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in