अकरावीच्या ‘ओपन टू ऑल’ फेरीचे वेळापत्रक जाहीर; पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संधी

अकरावीच्या ‘ओपन टू ऑल’ फेरीचे वेळापत्रक जाहीर; पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संधी

राज्यातील अकरावी प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर शिक्षण संचालनालयाने ‘ओपन टू ऑल’ फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ४ व ५ ऑगस्ट रोजी वि‌द्यार्थ्यांना प्राधान्यक्रम व अर्जाचा भाग एक मध्ये दुरुस्ती तसेच नव्याने नोंदणी करता येईल. या प्रवेशाची गुणवत्ता यादी ६ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
Published on

मुंबई : राज्यातील अकरावी प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर शिक्षण संचालनालयाने ‘ओपन टू ऑल’ फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ४ व ५ ऑगस्ट रोजी वि‌द्यार्थ्यांना प्राधान्यक्रम व अर्जाचा भाग एक मध्ये दुरुस्ती तसेच नव्याने नोंदणी करता येईल. या प्रवेशाची गुणवत्ता यादी ६ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या फेरीमध्ये पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे.

अकरावी प्रवेशाच्या  ‘ओपन टू ऑल’ या फेरीला ४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता सुरूवात होईल. या फेरीसाठी ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत वि‌द्यार्थ्यांना प्राधान्यक्रम व अर्जाचा भाग एक मध्ये दुरुस्ती करता येणार आहे. पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या प्रवेश फेरीमध्ये नाव नोंदणी करू शकतात. महाविद्यालय निवड यादी ६ ऑगस्टलाप्रसिद्ध करण्यात येणार आहे.

‘ओपन टू ऑल’ या फेरीअंतर्गत महत्त्वाचे

  • जुलै २०२५ च्या राज्यमंडळ संलग्नित मंडळाचे पुरवणी परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. 

  • यापूर्वी अपूर्ण अर्जाचा भाग एक व दोन असल्यास अशा विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज पूर्ण भरता येईल. 

  • या फेरीमध्ये अर्जाच्या भाग व एक-दोन मध्ये आवश्यकतेनुसार व प्राधान्यक्रममध्ये बदल करता येईल. 

  • अद्यापपर्यंत नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या फेरीदरम्यान नव्याने नोंदणी व प्राधान्यक्रम देता येतील.

logo
marathi.freepressjournal.in