गडचिरोली : जिल्हाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी; मंजुरी आदेश तयार केल्याप्रकरणी नगरसेवकाला अटक

जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठानचे लेटरहेड वापरून तसेच जिल्हाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून प्रशासकीय मंजुरीचे खोटे आदेश तयार केल्याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी एका नगरसेवकाला अटक केली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गडचिरोली : जिल्हाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी; मंजुरी आदेश तयार केल्याप्रकरणी नगरसेवकाला अटक
गडचिरोली : जिल्हाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी; मंजुरी आदेश तयार केल्याप्रकरणी नगरसेवकाला अटक
Published on

गडचिरोली : जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठानचे लेटरहेड वापरून तसेच जिल्हाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून प्रशासकीय मंजुरीचे खोटे आदेश तयार केल्याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी एका नगरसेवकाला अटक केली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. काही अज्ञात व्यक्तींनी जिल्हाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून आणि जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठानच्या लेटरहेडचा गैरवापर करून विकासकामांचे खोटे प्रशासकीय मंजुरी आदेश तयार केल्याचे या तक्रारीत म्हटले होते. या बनावट आदेशांद्वारे विविध विकासकामांसाठी निधी मंजूर झाल्याचे भासवून हे दस्तावेज काही व्यक्ती आणि कार्यालयांमध्ये फिरवण्यात आले होते.

धरपकड

या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे, पोलिसांनी रविवारी चामोर्शी नगरपंचायतीचे नगरसेवक आशिष पिपरे यांना छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले.

भाजपमधून हकालपट्टी

अटक करण्यात आलेला आरोपी आशिष पिपरे हा काही महिन्यांपूर्वीपर्यंत भाजपचा कार्यकर्ता होता. मात्र, त्याच्यावर झालेल्या इतर फसवणुकीच्या आरोपांमुळे पक्षाने त्याची हकालपट्टी केली होती. विशेष म्हणजे, त्याची पत्नी सध्या गडचिरोलीत भाजपची नगरसेविका आहे.

पोलीस कोठडी

अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपी पिपरे याला सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीला ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in