गडकरी, फडणवीस राज्यात भाजपच्या प्रचाराचे नेतृत्व करणार, विविध समित्यांमध्ये २१ नेत्यांचा समावेश

विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्यातील भाजपचे सर्व नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
गडकरी, फडणवीस राज्यात भाजपच्या प्रचाराचे नेतृत्व करणार, विविध समित्यांमध्ये २१ नेत्यांचा समावेश
संग्रहित फोटो
Published on

नागपूर : विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्यातील भाजपचे सर्व नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे सांगितले. नितीन गडकरी यांनी निवडणूक प्रचारासाठी पूर्ण वेळ द्यावा अशी विनंती त्यांना करण्यात आली असून त्यांनी ती मान्यही केली आहे, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २१ नेत्यांचा विविध समित्यांमध्ये समावेश करण्यात आला असून त्यांच्यावरील जबाबदाऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत. बुथस्तरावील व्यवस्थापनाची योजना भाजपने आखली आहे. गडकरी यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हेही राज्यातील प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in