गडकरी-शरद पवार भेट
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी कँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली. महाराष्ट्रातून जाणाऱ्या हरित महामार्गाबाबत गडकरी-पवार यांच्यात चर्चा झाली. नाशिक व नगरच्या शेतकऱ्यांनी आपल्या समस्या गडकरी यांच्यासमोर मांडल्या. तसेच लेखी निवेदनही दिले. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरेही यावेळी उपस्थित होते.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव डीए?
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वाढीव डीएला (महागाई भत्ता) केंद्रीय अर्थखात्याने मंजुरी दिली आहे. ही फाईल आता केंद्रीय मंत्रिमंडळाकडे गेली आहे. आता बुधवारी केंद्रीय मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना ४ टक्के महागाई भत्ता जाहीर होण्याची शक्यता आहे.