गणेशोत्सवाला प्रारंभ! थाटामाटात विधिवत गणरायाची प्राणप्रतिष्ठा

मुंबईसह महाराष्ट्रात शनिवारपासून गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सकाळपासून घरोघरी व सार्वजनिक मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
गणेशोत्सवाला प्रारंभ! थाटामाटात विधिवत गणरायाची प्राणप्रतिष्ठा
Published on

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात शनिवारपासून गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सकाळपासून घरोघरी व सार्वजनिक मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून गणपती घरोघरी आणले जात होते. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष घरोघरी व रस्त्यात सुरू होता. रिक्षा, कार तर काही जण चालत गणपतीची मूर्ती आणताना दिसत होते.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी काही दिवसांपूर्वीच गणपतीची मूर्ती मंडपात आणली होती. त्या मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गणपतीसाठी पूजेचे साहित्य, फुले, भाज्या, मिठाई व आरास करणाऱ्या दुकानांमध्ये गर्दी होती.

अनेक राजकीय नेते व बॉलीवूडच्या अभिनेते व अभिनेत्री आपल्या घरात गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. पुढील दहा दिवसांसाठी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. मुंबईत सुरक्षेसाठी १५ हजार पोलीस तैनात केले आहेत. यात ३२ पोलीस उपायुक्त, ४५ सहाय्यक आयुक्त, २४३५ अधिकारी, १२४२० कॉन्स्टेबल, होमगार्ड, राखीव पोलीस दल, धडक कृती दल, दंगलविरोधी पथक तैनात केले आहे.

मुंबईत १२ हजार सार्वजनिक तर २ लाख २४ हजार घरगुती गणपती आहेत. तर ठाण्यात २ लाख ५५ हजार घरगुती गणपतींची प्राणप्रतिष्ठापना झाली. नवी मुंबईत सार्वजनिक ८८६ तर घरगुती ९२,६०३ गणपतींची प्रतिष्ठापना झाली.

गणेशोत्सवाला प्रारंभ! थाटामाटात विधिवत गणरायाची प्राणप्रतिष्ठा
नवशक्ति-FPJ इको गणेश: पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा आणि जिंका मोठी बक्षिसे

मुंबई मनपाकडे गणेश मंडळाचे ३३५८ अर्ज आले. तर २६३५ मंडळांना परवानगी देण्यात आली. लालबाग, परळ, गिरगाव, अंधेरी, चेंबूर, फोर्ट आदी भागात गणेशभक्तांची गणपती बघायला गर्दी उसळली आहे.

‘लालबागचा राजा’ला भेट देण्यासाठी पहिल्याच दिवशी हजारो भक्तांची गर्दी उसळली आहे. तसेच चिंचपोकळी, गणेश गल्ली, तेजुकाया आदी गणेशोत्सव मंडळाचे गणपती बघायला रीघ लागली आहे. माटुंगा येथील जीएसबी सेवा मंडळाचा गणपती सुवर्ण अलंकारांनी मढवला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला गणेशोत्सव पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरा करावा. तसेच महाराष्ट्राची संस्कृती व वैभव याचे प्रतिबिंब या गणेशोत्सवातून उमटू द्या. समाजातील गरजू व्यक्तींना गणेश भक्तांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

गणेश विसर्जनाच्या वेळी समुद्रात जेलीफिशपासून सावध राहावे, असे आवाहन मुंबई मनपाने केले आहे. कारण विसर्जनावेळी शेकडो भाविक समुद्रात उतरतात. तेव्हा त्यांना हे जेशी फिश दंश करू शकतात.

logo
marathi.freepressjournal.in