मंडप, डेकोरेटर्सना वाढती मागणी; गणेशोत्सव काळात करोडो रुपयांची उलाढाल

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे लहान-मोठी मंडळे बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत बुडाली आहेत. मंडप, डेकोरेशनची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. मजुरांचे पगार आणि साहित्याच्या किमती वाढल्याने मंडप आणि डेकोरेशन मालकांनी बजेट वाढवले असले तरी मंडळांकडून मागणी कमी झालेली नाही. त्यामुळे मंडप, डेकोरेटर्सची गणेशोत्सव काळात करोडो रुपयांची उलाढाल होत आहे.
मंडप, डेकोरेटर्सना वाढती मागणी; गणेशोत्सव काळात करोडो रुपयांची उलाढाल
Published on

मुंबई : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे लहान-मोठी मंडळे बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत बुडाली आहेत. मंडप, डेकोरेशनची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. मजुरांचे पगार आणि साहित्याच्या किमती वाढल्याने मंडप आणि डेकोरेशन मालकांनी बजेट वाढवले असले तरी मंडळांकडून मागणी कमी झालेली नाही. त्यामुळे मंडप, डेकोरेटर्सची गणेशोत्सव काळात करोडो रुपयांची उलाढाल होत आहे.

गणेशोत्सवाची तयारी मंडप, डेकोरेटर्सपासून सुरू होते. पंडालचा आकार, थीम, सामग्री, श्रमिक खर्च, रोषणाई आदीवर बजेट ठरते. लहान ते अगदी नामांकित गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सवासाठी मंडप आणि डेकोरेशनवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. सध्या मोठ्या मंडळांची मंडप, डेकोरेशनची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत, तर लहान मंडळे जमवाजमवी करू लागले आहेत.

गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवात सजावट करण्यासाठी एका मध्यम आकाराच्या मंडळाला ७५ हजारांपासून ९० हजारापर्यंतच्या खर्च येतो. रोषणाई आणि पंडाल उभारण्यासाठी लागणारे साहित्य महाग झाल्याने मंडप आणि डेकोरेशनचे बजेटही वाढले आहे. त्यातच दरवर्षी मजुरांचा पगार वाढत असल्याने महागाईप्रमाणे मंडळांचे बजेट वाढले आहे. पंडाल गणेशोत्सवाच्या दहा पाच दिवस अगोदर ते नवरात्र उत्सव संपेपर्यंत उभारण्यात येतात. त्यामुळे अशा मंडळांचे बजेट अधिक असते. मुंबईतील सर्व ठिकाणी हजारो लोक या व्यवसायामध्ये काम करत आहेत. केवळ गणेशोत्सव काळात मंडप, डेकोरेटर्सची करोडो रुपयांची उलाढाल होत असावी, असे जॉन मंडप, डेकोरेटर्सचे मालक जॉन मकासरे यांनी संगितले.

हाऊसिंग सोसायटी /लहान मंडळे

साधारण मंडप आणि बेसिक सजावट : २५ ते ७५ हजार

थीम-आधारित, फुले, इको-फ्रेंडली साहित्य : १ ते २ लाख

सार्वजनिक मंडळे

डेकोरेशन, थीम, मंडप स्ट्रक्चर : ३ ते २० लाख

परेल, गिरगाव, दादरमधील काही मंडळे : २५ ते ३० लाखांपर्यंत खर्च करतात.

सार्वजनिक मोठे गणेश मंडळ

छोटे /इको-फ्रेंडली मंडळ (सोसायटी) : २५ हजार ते २.७५ लाख

फुलांचा बॅकड्रॉप / सामान्य सजावट : २५ हजार (५ दिवसांसाठी)

मजुरी/इको-साहित्य खर्चात वाढ : १०-१५ टक्के वाढ

मजुरी दिवसाला : रु. १,२०० पर्यंत

खर्चाचे अंदाज

घरगुती गणपती (१-२ मूर्ती / छोट्या सोसायट्या)

साधे फुल, कापड, दिवे लावलेले डेकोरेशन : ५ ते १५ हजार

आकर्षक बॅकड्रॉप, लाइटिंग, फुलांची सजावट : २० ते ५० हजार

logo
marathi.freepressjournal.in