कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा! ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान वाहनांना टोलमाफी

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना यंदाही टोलमधून सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार ११ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुंबई-बेंगळुरू,  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांनावर कोणताही टोल आकारण्यात येणार नाही.
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा! ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान वाहनांना टोलमाफी
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा! ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान वाहनांना टोलमाफी संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना यंदाही टोलमधून सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार ११ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुंबई-बेंगळुरू,  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांनावर कोणताही टोल आकारण्यात येणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने मंगळवारी याबाबतचे परिपत्रक जारी केले.

गणेशभक्तांना टोल सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्वतंत्र स्टिकर किंवा पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पासवर संबंधित वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाणार आहे. परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस विभाग आणि संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या समन्वयातून आवश्यक त्या ठिकाणी हे पास उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पोलिस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या तसेच आरटीओ कार्यालयांमध्येही पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा! ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान वाहनांना टोलमाफी
मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेस उद्यापासून रोज धावणार

परतीच्या प्रवासासाठीही पास ग्राह्य

प्रवासासाठीदेखील हा पास परतीच्या ग्राह्य धरला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील कोकणाकडे जाणाऱ्या संबंधित मार्गांवरील पथकर नाक्यांवर ही टोलमाफी लागू राहणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या ‘एसटी’ महामंडळाच्या बसनाही टोल सवलतीची  सुविधा देण्यात येणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in