घाटी रूग्णालयात राडा; टोळक्याची रूग्णाला जबर मारहाण, महीला डॉक्टरचंही डोकं फुटलं

या घटनेत रुग्ण जखमी झाला, तर डोक्यात लोखंडी रॉड लागल्याने महिला डॉक्टरलाही गंभीर दुखापत झाली आहे.
घाटी रूग्णालयात राडा; टोळक्याची रूग्णाला जबर मारहाण, महीला डॉक्टरचंही डोकं फुटलं

छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात घुसून टोळक्याने उपचार सुरू असलेल्या एका रुग्णाला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत रुग्ण जखमी झालाच, पण डोक्यात लोखंडी रॉड लागल्याने महिला डॉक्टरलाही गंभीर दुखापत झाली आहे.

हा तुफान राडा सुरू असताना सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी न केल्यामुळे चार जवानांना निलंबित करण्यात आले आहे. तथापि, या मारहाणीचे कारण अजून पुढे आलेले नाही. दोन्ही गटांकडून फ्री स्टाईल मारामारी सुरु होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेत महिला डॉक्टरला जबर मार लागला. त्यांच्यावर घाटी रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.

या घटनेचे CCTV फुटेज व्हायरल झालं असून या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक गट रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये घुसताना दिसत आहे. त्यानंतर ते रुग्णांसाठी असलेल्या पलंगाकडे चालत जातात. जिथे एक जखमी व्यक्ती उपचार घेत असल्याचे दिसून येते. काही क्षणातच ते त्या व्यक्तीवर रॉडने हिंसक हल्ला करतात. या गोंधळात शेजारी उभ्या असलेल्या एका महिला डॉक्टरला रॉडचा फटका बसून मोठी दुखापत झाली.

रुग्णालयाचे डीन डॉ, शिवाजी सुक्रे यांनी या प्रकरणाती दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे माध्यमांना सांगितले. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in