त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नांदेडमध्ये गंगापूजन

भाऊचा माणुसकीचा फ्रिज व लायन्सचा डबाच्या अन्नदात्यांचा सन्मानही यावेळी करण्यात येणार आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नांदेडमध्ये गंगापूजन

नांदेड : धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे सतत २२ व्या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या गोदावरी गंगापूजनाची जय्यत तयारी झाली असून, यामध्ये एकसूत्रीपणा यावा यासाठी उपस्थित राहणाऱ्या शेकडो महिला यावर्षी हिरव्या रंगाच्या साड्या परिधान करून येणार आहेत. सोमवारी सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त घेण्यात येणाऱ्या गोदावरी गंगापूजनामध्ये शेकडो महिला एकाच वेळी गोदावरी नदीची आरती करतात. त्यानंतर आपल्या परिवारातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी हजारो दिवे नदीपात्रात सोडले जातात. हे नयनमनोहर दृश्य पाहण्यासाठी नगीनाघाटावर दरवर्षी प्रचंड गर्दी असते.

भाऊचा माणुसकीचा फ्रिज व लायन्सचा डबाच्या अन्नदात्यांचा सन्मानही यावेळी करण्यात येणार आहे. संतोषगुरु परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने गोदावरी पूजन करण्यात येणार आहे. या सोहळ्याला नांदेडकरांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक अॅड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in