
मुंबई : कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांचे आरक्षण गणपतीच्या काळात अवघ्या दोन ते तीन मिनिटात फुल्ल झाल्याने समस्त कोकणवासीयांचे लक्ष गणपती स्पेशल रेल्वेगाड्यांकडे लागले होते. आता मध्य रेल्वेने २५० गणपती विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. या गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण दि. २४ जुलैपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर व www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह सुरु होईल.
गाड्यांचे वेळापत्रक
सीएसएमटी–सावंतवाडी रोड दैनिक विशेष ट्रेन (४० सेवा)
०११५१ विशेष ट्रेन सीएसएमटी येथून दि. २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान दरम्यान दररोज रात्री १२.२० वाजता सुटेल (२० सेवा) आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी १४.२० वाजता पोहोचेल.
०११५२ विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दि. २२ ऑगस्ट रोजी रोज ३.३५ वाजता सुटून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी ४.३५ वाजता पोहचेल
सीएसएमटी–सावंतवाडी रोड –सीएसएमटी दैनिक विशेष ट्रेन (३६ सेवा)
०११०३ विशेष ट्रेन सीएसएमटी येथून दि. २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान दररोज ३.३० (१८ सेवा) वाजता सुटून सावंतवाडीला त्याच दिवशी ४ वाजता पोहचेल. ०११०४ विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून २३ ऑगस्ट रोजी सुटून ९ सप्टेंबर दरम्यान पहाटे ४.३५ वाजता सुटून सीएसएमटीला त्याच दिवशी दुपारी ४.४० वाजता पोहचेल.
सीएसएमटी –रत्नागिरी– सीएसएमटी विशेष ट्रेन (३६ सेवा) ०११५३ विशेष गाडी सीएसएमटी येथून दि. २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरला सकाळी ११.३० वाजता सुटून (१८ सेवा) रत्नागिरीला त्याच दिवशी ८.१० वाजता पोहचेल.
०११५४ विशेष ट्रेन रत्नागिरी येथून २३ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान चालवली जाईल. दररोज ही गाडी सकाळी ४ वाजता सुटून सीएसएमटीला दुपारी १.३० वाजता पोहचेल.
एलटीटी-सावंतवाडी रोड दैनिक विशेष ट्रेन (३६ सेवा)
०११६७ विशेष गाडी एलटीटीवरून २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान चालवल्या जातील. ही गाडी रात्री ९ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.२० वाजता पोहचेल.
०११६८ ही विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दि. २३ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान ११.३५ वाजता सुटून एलटीटी येथे रात्रौ १२.४० वाजता पोहचेल.
एलटीटी-सावंतवाडी रोड दैनिक विशेष ट्रेन (३६ सेवा)
०११७१ ही विशेष ट्रेन एलटीटीहून २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ०८.२० वाजता दररोज सुटेल (एकूण १८ सेवा) आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी रात्री २१.०० वाजता पोहोचेल. ०११७२ ही ट्रेन सावंतवाडीहून २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत दररोज २२.३५ वाजता सुटेल (एकूण १८ फेऱ्या) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता पोहोचेल.
एलटीटी – सावंतवाडी रोड-एलटीटी (साप्ताहिक विशेष ट्रेन) -६ सेवा
०११२९ साप्ताहिक विशेष ट्रेन दि. २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर रोजी एलटीटी येथून सकाळी ०८.४५ वाजता सुटेल (एकूण ३ सेवा) आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी रात्री १०.२० वाजता पोहचेल.
०११३० ही विशेष ट्रेन २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर रोजी सावंतवाडी रोड येथून २३.२० वाजता सुटेल (एकूण ३ सेवा) आणि एलटीटीला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल.
एलटीटी-मडगाव-एलटीटी -४ सेवा
०११८५ ही साप्ताहिक विशेष ट्रेन २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी एलटीटी येथून रात्रौ १२.४५ वाजता सुटून (२ सेवा) आणि मडगाव येथे त्याच दिवशी दुपारी २.३० वाजता सुटेल.
०११८६ ही साप्ताहिक विशेष ट्रेन २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी मडगाव येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटून एलटीटी येथे सकाळी ४.५० वाजता पोहचेल.
एलटीटी-मडगाव-एलटीटी (एसी विशेष ट्रेन) - ६ सेवा
०११६५ एसी साप्ताहिक विशेष ट्रेन २६ ऑगस्ट २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर रोजी एलटीटी येथून ००.४५ वाजता सुटेल (३ सेवा) आणि मडगाव येथे त्याच दिवशी दुपारी १४.३० वाजता पोहोचेल.
०११६६ एसी साप्ताहिक विशेष ट्रेन मडगाव येथून प्रत्येक मंगळवारी २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी १६.३० वाजता सुटेल (३ सेवा) आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०४.५० वाजता पोहोचेल.
पुणे -रत्नागिरी साप्ताहिक विशेष ट्रेन (६ सेवा)
०१४४७ साप्ताहिक विशेष ट्रेन २३ ऑगस्ट,३० ऑगस्ट व ६ सप्टेंबर रोजी पुण्याहून दुपारी रात्रौ १२.२५ वाजता सुटून रत्नागिरीत त्याच दिवशी ११.५० वाजता पोहोचेल.
०१४४८ साप्ताहिक विशेष ट्रेन २३, ३० ऑगस्ट व ६ सप्टेंबर रोजी ५.५० सुटून पुण्यात दुसऱ्या दिवशी ५ वाजता पोहचेल.
पुणे -रत्नागिरी एसी साप्ताहिक विशेष ट्रेन (६ सेवा)
०१४४५ एसी साप्ताहिक विशेष ट्रेन २६ ऑगस्ट,२ व ९ सप्टेंबर रोजी पुणे येथून ००.२५ वाजता सुटून रत्नागिरीत त्याच दिवशी ११.५० वाजता पोहोचेल.
०१४४६ एसी साप्ताहिक विशेष ट्रेन २६ ऑगस्ट, २, ९ सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथून १७.५० वाजता सुटून पुण्यात दुसऱ्या दिवशी ०५.०० वाजता पोहोचेल.
दिवा–चिपळूण– दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाड्या (३८ सेवा)
०११५५ मेमू विशेष गाडी दिनांक २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान दिवा येथून दररोज ०७.१५ वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.
०११५६ मेमू विशेष गाडी दि. २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान चिपळूण येथून रोज १५.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २२.५० वाजता दिवा येथे पोहोचेल.