EVM मशिनला हार घालणं भोवणार? शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघांचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी ईव्हीएम मशिनला हार घातला.
शांतिगिरी महाराज
शांतिगिरी महाराजशांतिगिरी महाराज

नाशिक: आज देशभरात लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातही एकूण १३ लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघांचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी ईव्हीएम मशिनला हार घातल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आचारसंहितेचं उल्लंघन गेल्याप्रकरणी शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झाला आहे.

ईव्हीएम मशिनला घातला हार, शांतिगिरी महाराजांवर गुन्हा-

नाशिक लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदारसंघात मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज निवडणूकीच्या रिंगणात आहेत. शांतिगिरी महाराज यांनी आज सकाळी सात वाजता निवडणूक केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यादरम्यान त्यांनी ईव्हीएमला हार घातला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्यानं त्रंबकेश्वर पोलिसांनी शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in