
जळगाव : जळगावात तीन वर्षांच्या बालकाला जीबीएसची लागण झाल्याचे समोर आले असून त्याला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एका तीन वर्षांच्या बालकाला गेल्या काही दिवसांपासून पायदुखीचा त्रास जाणवत होता. त्याची रक्ताची तपसणी केली असता त्यास जीबीएसची लागण झाल्याचे समोर आले आहे.