भ्रष्टाचारमुक्तीसाठी ‘जेम’ हे प्रभावी माध्यम

भारतभरामध्ये १५० पेक्षा जास्त प्रमुख शहारामधून बुधवारपासून १५ दिवसांची ही मोहीम सुरू करण्यात आली.
भ्रष्टाचारमुक्तीसाठी ‘जेम’ हे प्रभावी माध्यम

जेम अर्थात गव्हर्मेंट ई-मार्केट प्लेस यांच्यातर्फे पुण्यामध्ये ‘सेलर संवाद’ आयोजित करण्यात आला होता. भारतभरामध्ये १५० पेक्षा जास्त प्रमुख शहारामधून बुधवारपासून १५ दिवसांची ही मोहीम सुरू करण्यात आली. त्याची सुरुवात पुण्यात झाली.

ग्राहक असलेली सरकारी कार्यालये व विक्रेते यामधील दुवा म्हणून काम करणाऱ्या जेमद्वारे भारतभरातील विक्रेत्यांमध्ये जेम पोर्टलविषयी संपूर्ण माहिती मिळावी त्यांच्या अडचणींना  उत्तर द्यावे, त्यांना अधिक कोणते लाभ मिळू शकतात याबद्दल माहिती द्यावी, सोबतच जेमने आत्तापर्यंत काय प्रगती केली आहे आणि जेम आणखी कोणकोणत्या सुविधा विक्रेत्यांना देऊ शकतात, याबद्दल एका सादरीकरणाद्वारे उपस्थित विक्रेत्यांना माहिती दिली गेली. अवघ्या सहा वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या जेम याऑनलाइन आणि त्यामुळेच पारदर्शी ठरलेल्या पोर्टलच्या माध्यमातून आजघडीला सुमारे तीन लाख कोटीपेक्षा अधिक रकमेचा व्यापार होत असून आगामी काळात त्याचे प्रमाण आणखी वाढावे, त्यासाठीच सेलर संवादसारख्या या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

पुण्यातील १४ कंपनीच्या प्रतिनिधींनी यासंवादामध्ये सहभाग नोंदवला. यामध्ये माय लॅब सारखी स्टार्ट अप कंपनी तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगकंपन्यांचा अधिक सहभाग होता.

या कार्यक्रमामध्ये जेम दिल्ली कार्यालयाच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंजू शर्मा तसेच संचालकअनुप धनविजय, अर्पित वाजपेयी, विक्रमजीत शर्मा, महाराष्ट्राचे व्यवसाय समन्वयक निखिल पाटील उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in