राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर

सर्वोच्च न्यायालयाने जे जिल्हे किंवा विभाग पावसामुळे प्रभावित होणार नाहीत. किंवा जिथे तुरळक पाऊस असतो, अशा ठिकाणी निवडणूका घेण्याचे आदेश दिले होते
राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर
Published on

राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यासाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून १९ ऑगस्टला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहेत. निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारपासूनच लागू झाली आहे.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा या १७ जिल्ह्यांतील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणूका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे जिल्हे किंवा विभाग पावसामुळे प्रभावित होणार नाहीत. किंवा जिथे तुरळक पाऊस असतो, अशा ठिकाणी निवडणूका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in