रमाई आवास योजनेतील ३ हजार ५४९ पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर

या योजनेत सन २०२३-२४ साठी जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील एकूण ३ हजार ५४९ बेघर व पात्र लाभार्थ्यांना घरकुलास मंजुरी देण्यात आली
रमाई आवास योजनेतील ३ हजार ५४९ पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर

नांदेड : अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकातील कुटूंबाना घर, निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी रमाई आवास घरकुल (शहरी व ग्रामीण) योजना राबविली जाते. या योजनेत सन २०२३-२४ साठी जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील एकूण ३ हजार ५४९ बेघर व पात्र लाभार्थ्यांना घरकुलास मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त, शिवानंद मिनगिरे यांनी दिली.

सन २०२३-२४ या मध्ये जिल्ह्यासाठी रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रासाठी प्राप्त उदिष्टांच्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायत, गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडून घरकुलासाठी प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्राप्त प्रस्तावांना पालकमंत्री तथा अध्यक्ष रमाई आवास घरकुल योजना जिल्हा निवड समिती, नांदेड यांच्याकडून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे, असे समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

logo
marathi.freepressjournal.in