आधी प्रचार, आता बजावला मतदानाचा हक्क; पुन्हा एकदा गिरीश बापट चर्चेत

आज पुणे पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा दिवस संपला असून दोन्ही मतदारसंघाची टक्केवारी समोर
आधी प्रचार, आता बजावला मतदानाचा हक्क; पुन्हा एकदा गिरीश बापट चर्चेत

भाजपने कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी खासदार गिरीश बापट यांना प्रचारासाठी उतरवले आणि सगळीकडे चर्चा झाली. आजारपणातही त्यांनी भाजपच्या प्रचार सभेत हजेरी दर्शवली. तर, आता त्यांनी व्हीलचेअरवरून मतदानाला हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांची चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी अहिल्यादेवी शाळेत पोहचून मतदान केले. आजारपणातही ते मतदान करण्याचा हक्क विसरले नाहीत, म्हणून त्यांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.

दरम्यान, आजचा मतदानाचा दिवस संपला असून दिवसभरात किती मतदान झाले? याची आकडेवारी आता समोर आली आहे. दोन्ही मतदारसंघात सरासरी ५० टक्केही मतदान झालेले नाही. कसबा पेठ मतदारसंघात आता दिवसभरात ४५.२५ टक्के मतदान झाले आहे. तर, चिंचवड मतदारसंघात ४१.१ टक्के मतदान झाले आहे. निवडणूक आयोगाकडून ही काडेवारी समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in