युवतीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

दोरीच्या साहय्याने घरातील लोखंडी अँगलला गळ्यास गळफास घेत आत्महत्या केली
युवतीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

कराड : महाबळेश्वर येथील जिजामाता हौसिंग सोसायटीमध्ये राहणारी साक्षी प्रकाश कासुर्डे (वय १९) हिने राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याबाबतची फिर्याद संजय काळु कासुर्डे यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सायंकाळी उशिरा याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

महाबळेश्वर शहरापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर असलेली जिजामाता हौसिग सोसायटीमध्ये साक्षी आपल्या कुटुंबीयांसह राहत होती. ती शनिवारी दुपारी दोन वाजता कामावरून घरी जेवण्यासाठी गेली असता, घरी जेवण करून आपल्या राहत्या घरी एका बंद खोलीत तिने दोरीच्या साहय्याने घरातील लोखंडी अँगलला गळ्यास गळफास घेत आत्महत्या केली. सदर बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्याने त्यांनी तिला खाली उतरवून शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल करण्यासाठी घेऊन गेले असता, तेथील डॉक्टरांनी मयत झाल्याचे घोषित केले. याबाबत संजय कासुर्डे यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, गळफास घेण्याचे कारण अस्पष्ट असल्यामुळे पुढील तपास महाबळेश्वर पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in