अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या - वर्षा गायकवाड

राष्ट्रप्रेमाखातर मराठी साहित्याच्या माध्यमातून क्रांतीचे रणशिंग फुंकणारे अण्णाभाऊ यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा
File Photo
File Photo
Published on

मुंबई : शोषित, श्रमिक आणि वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चेंबूर येथे उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी "देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊंनी बजावलेली भूमिका, दिलेले योगदान अमूल्य आहे. राष्ट्रप्रेमाखातर मराठी साहित्याच्या माध्यमातून क्रांतीचे रणशिंग फुंकणारे अण्णाभाऊ यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा. असे प्रतिपादन मुंबई काँग्रेस नवनिर्वाचित अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविंद्र पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, मुंबई काँग्रेसचे महासचिव संदीप शुक्ला, महेंद्र मुणगेकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष कचरू यादव, तानाजी सुर्यवंशी, विलास तांबे, शंकर खडतरे, निलेश नानचे, नवीनकुमार शिलवंत, उषा कांबळे, योगेश शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in