गोकुळ दूध दोन रुपयांनी महागले

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ म्हणजेच गोकुळने म्हैस आणि गायीच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
गोकुळ दूध दोन रुपयांनी महागले
Published on

मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ म्हणजेच गोकुळने म्हैस आणि गायीच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे मुंबई आणि पुणेकरांना प्रतिलिटर ७४ रुपये तर कोल्हापूरसह इतर ठिकाणी प्रतिलिटर ६८ रुपयांना दूध विकत घ्यावे लागणार आहे.

‘अमूल’ आणि ‘मदर डेअरी’ने १ मेपासून दूध विक्रीदरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यापाठोपाठ आता गोकुळनेही दोन रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अमूलनंतर गोकुळ दुधाला राज्यात मोठी मागणी आहे. या निर्णयामुळे मुंबई आणि पुणे येथे म्हशीचे फुल क्रीम (क्लासिक) दूध आता ७४ रुपयांना मिळणार आहे. तर गायीचे (सात्विक) दूध आता ५८ रुपयांना मिळणार आहे. कोल्हापूरात हे दर कमी ठेवण्यात आले असून म्हशीचे दूध ६८ रुपयांना तर गायीचे दूध ५० रुपयांना मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in