मुंबई : पूर्व द्रुतगति महामार्गावर बुधवारी पहाटे गोल्डन जॅकेल (सोनेरी कोल्हा) या प्रजातीमधील एक प्रौढावस्थेतील कोल्हा मृतावस्थेत आढळला, असे वाईल्ड लाईफ वेल्फेअर ग्रुपच्या एका प्रतिनिधीने सांगितले. कांजुरमार्ग कोल्हा मिळाल्याचे समजताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले.
तेथील मूल्यमापनानुसार व परिस्थितीजन्य पुरावे पाहाता हा नर कोल्हा एखाद्या वाहनाला धडकला असावा व त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असे रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअरचे संस्थापक आणि वन विभागाचे मानद वन्यजीव वॉर्डन पवन शर्मा यांनी सांगितले. यापेक्षा या प्राण्यामध्ये अन्य काही गुंतागुंत आहे की नाही हे शोधण्यासाठी सविस्तर नेक्रोप्सी (पोस्टमार्टम) केली जाईल, असे ते म्हणाले.
पूर्व द्रुतगति महामार्ग म्हणजेच ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे हा मुंबई शेजारील नवी मुंबई आणि ठाणे यांना जोडणारा सर्वात वर्दळीचा रस्ता आहे.ह े ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य आणि खारफुटीच्या जंगलांजवळ स्थित आहे, हे कोळ्यांचे नैसर्गिक अधिवास आहे, शर्मा म्हणाले.
ते म्हणाले, "प्राण्यांना वाचवण्यासाठी इतर वैज्ञानिक उपायांसह मोक्याच्या ठिकाणी (महामार्गावर) वन्यजीव क्रॉसिंग क्षेत्राशी संबंधित साइन बोर्ड लावण्याबाबत आपण संबंधित अधिकाऱ्यांशी बोलू.