उद्धव ठाकरेंचा भाजपला आणखी एक धक्का? बडा नेता आज ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता

गोंदियाचे माजी आमदार आणि भाजप नेते रमेश कुथे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंचा भाजपला आणखी एक धक्का? बडा नेता आज ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता
Published on

विधानसभा निवडणुकीला आता खूप कमी कालावधी राहिला आहे. येत्या ३० ते ४० दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू शकते, अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे. गोंदियाचे माजी आमदार आणि भाजप नेते रमेश कुथे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आज दुपारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेश होणार आहे.

रमेश कुथे पूर्वी शिवसेनेत होते-

रमेश कुथे पूर्वी शिवसेनेत होते. परंतु २०१८ ला त्यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. आता ते पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. आज दुपारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेश होणार असल्याचं समजतंय. २०१८ साली रमेश कुथे यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु २१ जून २०२४ रोजी त्यांनी भाजपला रामराम केला. त्यानंतर ते आता पुन्हा एकदा घरवापसी करणार आहेत.

कोण आहेत रमेश कुथे?

रमेश कुथे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर गोंदिया मतदारसंघातून १९९५ आणि १९९९ अशी सलग दोनवेळा विधानसभा निवडणूक लढवली आणि सलग दोनवेळा ते आमदार झाले. त्यानंतर बराच काळ ते राजकारणापासून दूर होते. परंतु २०१८ मध्ये त्यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि सक्रिय राजकारणात परतले. परंतु नंतरच्या काळात राज्यातील भाजप नेत्यांवर ते नाराज होते. त्यानंतर त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र ते आता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

logo
marathi.freepressjournal.in