गोंदियात भाजपला धक्का; माजी आमदाराने धरला काँग्रेसचा 'हात'

काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत अग्रवाल यांनी काँग्रेसचा हात धरला.
गोंदियात भाजपला धक्का; माजी आमदाराने धरला काँग्रेसचा 'हात'
Published on

मुंबई : गोंदियातील भाजपचे नेते आणि माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत अग्रवाल यांनी काँग्रेसचा हात धरला. हा गोंदियात भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनिल केदार, शिवाजीराव मोघे आदी उपस्थित होते.

भाजप युती सरकार हे आयाराम गयाराम सरकार आहे. या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवण्यास राज्यातील जनता तयार आहे. विदर्भाच्या जनतेने नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे. आता विधानसभा निवडणुकीतही ते अशीच साथ देतील असा विश्वास यावेळी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in